श्रमिक एल्गार

श्रमिक एल्गार

श्रमिक एल्गार (2000) – 

चंद्रपुरातली दारूबंदी चळवळ म्हटलं की समोर येतं एकच नाव. पाराेमिता ... पारोमिता पारोमिता
चंद्रपुरातली दारूबंदी चळवळ म्हटलं की समोर येतं एकच नाव. पाराेमिता … पारोमिता…. पारोमिता

1. असंघटित क्षेत्रातील महिला, आदीवासी, दलित, कामगार, शेतकरी, शेतमजूरांची संघटना.

2. चंद्रपुर-गडचिरोली जिल्हयात संघटनेचे 25 हजार सभासद. 500 चे वर स्वयंसेवी कार्यकर्ते.

3. चंद्रपुर जिल्हयात 15 व गडचिरोली जिल्हयात 2 तालुक्यात कार्य. 

3. या संघटनेच्या माध्यमातुन गंजबसौदा मध्यप्रदेश येथून 167 वेठबिगाराची मुक्तता व प्रशासनाचे मदतीने पुर्नवसन.

4. 500 वर कोलाम, गोंड आदीवासीनां त्यांचे जमिनीचे हक्क मिळवून दिले. 

5. चिन्ना मट्टामी या माडिया तरूणाला नक्षलसमर्थक म्हणून पोलीसांनी ठार मारले. चिन्नाची आई जब्बेबाई हिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष. 

5. गडचिरोली जिल्हयातील 10 हजाराचे वर निष्पाप आदीवासी तरूणांकडून नक्षलसमर्थक म्हणून पोलीसांनी भरलेले फाॅर्म (सी नोट) रद्द करविले.

6. 1000 चे वर तरूण कामगारांची फ्रुट कंपनीच्या जाचातुन सुटका करण्यात पुढाकार 

7. निराधार, अपंग, बांबुकामगार, मुलांचे शिक्षणाचे प्रश्नावर वेळोवेळी, मोर्चे, आंदोलनाचे माध्यमातुन लोकलढा. 

8. राजीव गांधी घरकुल योजना क्रं. 1 चे 281 लाभाथ्र्यांना 2 कोटी रूपये थकीत निधी मिळवून देण्यासाठी लढा.

 9. संजय गांधी निराधार योजनेच्या शासन निर्णयात बदल करवून निराधारांना लाभ घेण्यास अडचणीच्या ठरलेल्या जाचक अटी रद्द करण्यासाठी लढा. 

10. रोजगार हमी योजनेचे मजूरांना प्रशिक्षण, कामाची मागणी व योजनेतील भ्रष्टाचार उघडकीस आणून मजुरांना न्याय. 

11. जबरानजोतधारक (अतिक्रमणधारक) पट्टे देण्यासाठी संघर्ष, वनहक्क कायद्याची अमंलबजावणीसाठी कार्य.

12. भुमी हक्क अभियानच्या माध्यमातुन जमिन कायद्याचे प्रशिक्षण व अतिक्रमणदारांचे अतिक्रमण कायम ठेवण्यासाठी लढा.

13. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रात मंजूर झालेल्या अदानी कोल माईन्सचे विरोधात चंद्रपूर बचाव संघर्ष समितीसोबत संघर्ष करून पर्यावरण रक्षणासाठी कार्य.

14. वनक्षेत्रात असलेल्या बांबु कारागीर आदीवासींना त्यांचे निस्ताराप्रमाणे व अल्प दरात बांबू मिळावे यासाठी संघर्ष. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियान

15. व्यसनमुक्त समाजाची निर्मितीसाठी चंद्रपुर जिल्हयातील दारूचे सर्व परवाने रद्द करून, चंद्रपुर जिल्हयाचे दारूमुक्तीचे आंदोलन.

16. 7000 महिला-पुरूषांची चंद्रपूर येथे रॅली, जुब्ली हाॅयस्कुल येथे जाहीर सभा.

17. 30 संप्टेबर 2010 रोजी चंद्रपुर जिल्हयातील 15 तालुक्यात तहसिल कार्यालयासमोर महिलांचे लाक्षणिक उपोषण.

18. 100 च्या वर ग्राम सभेतुन चंद्रपुर जिल्हा दारूमुक्तीसाठी ग्राम सभेचे ठराव मंजुर.

19. उमरी पोद्दार तहसिल पोभुर्णा जि. चंद्रपुर येथील परवानाचे दारू दुकान बंद करण्यासाठीचा यशस्वी लढा.

20. जिवती व बोरचांदली त. मुल येथील प्रस्तावित बियर बार ला परवानगी मिळू नये यासाठी लढा.

21. चंद्रपुर जिल्हा दारूमुक्त करा या मागणीसाठी 6000 च्यावर महिला-पुरूषांची क्रांतीभुमी चिमुर ते विधानसभा नागपुर अशी पाच दिवसांची ऐतिहासीक पद यात्रा.

22. चंद्रपुर जिल्हयातील 40 च्यावर गावातील अवैध दारू विक्री बंद करून, गावात दारूबंदी.

23. 200 कार्यकर्तासोबत जेलभरो आंदोलन—6 दिवस नागपूर कारागृहात24. दारूबंदीसाठी पालकमंत्रीच्या घरासमोर मुंडण आंदोलन

25. 1 एप्रिल 2015 पासून चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी लागू करवून घेतली.

26. दारूबंदीनंतर, दारूबंदीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी शासनासोबत पाठपुरावा,

27. बिहार दारूबंदीचा अभ्यास

28. दारूबंदीच्या जनजागृतीसाठी माराई पाटण ते महाकाली पदयात्रा.

29. चंद्रपूर- गडचिरोली- वर्धा या तिन जिल्हयातील दारूबंदीच्या अमंलबजावणीसाठी ​तिनही जिल्हयातील कार्यकत्याची बैठक, तीनही जिल्हयात आंदोलन.

30. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना व बचत गटांच्या महिलांना व्यसनमुक्ती व दारूबंदीचे प्रशिक्षण.