निधी संकलनासाठी अवर डेमॉक्रासीने घेतला पुढाकार 

निधी संकलनासाठी अवर डेमॉक्रासीने घेतला पुढाकार 
September 29, 2019 No Comments Paromita Goswami Paromita Goswami

जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार ऍड. पारोमिता गोस्वामी यांच्या कामाची दखल घेऊन अवर डेमॉक्रासीने निधी संकलनासाठी पुढाकार घेतला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निधी संकलित करण्यासाठी सामाजिक उमेदवार ऑनलाइन क्राउड फंडिंगचा आधार घेतात. ऑनलाइन फंड गोळा करण्यासाठी आजवर बिहारचे बेगूसरायचे सीपीआई उम्मीदवार कन्हैया कुमार, दिल्लीत आपचे राघव चड्ढा, प. बंगालमध्ये रायगंज येथील सीपीआई (माले)चे  मोहम्मद सलीम, यवतमाळ येथिल लोकसभा उमेदवार, शेतक-याची विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या सारख्यानी अवर डेमॉक्रासीचा आधार घेतला होता.
चंद्रपूर जिल्हा दारुबंदीच्या प्रणेत्या पारोमिता गोस्वामी यांच्या निवडणुकीसाठी लोक स्वतःहून आर्थिक मदतीसाठी पुढे येत आहेत. यात महिलांचं प्रमाण लक्षणीय आहे. जिल्ह्यातील दारूबंदीसाठी उभारलेला लढा सर्वांना ठावूक आहे. हजारो महिलांच्या समर्थनानं हा लढा त्यांनी यशस्वी करून दाखवला. तेव्हापासून त्या महिलांच्या गळ्यातील ताईत झाल्या. आता त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर मतदारसंघातील महिला पुढाकार घेऊन त्यांच्या विजयासाठी निधी जमा करीत आहेत. अनामत रक्कम जमवण्यासाठी गावागावातून महिला आर्थिक मदत करीत आहेत. ताईंनी आमच्यासाठी आजवर बरीच कामं आणि संघर्ष केला. त्यामुळं त्यांच्यासाठी काही करण्याची संधी आम्हाला आता मिळाली, असे  येथील महिलांचे म्हणणे आहे.  श्रमिक एल्गारच्या संस्थापिका तथा आम आदमी पार्टीच्या उमेदवार ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी सांगितले की, लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी मी वचनबद्ध आहे. समाजातील सर्व घटकाला न्याय मिळावा, यासाठी माझी उमेदवारी आहे. मात्र निवडणुकीत लागणारा मोठा खर्च करण्याची ऐपत नाही. त्यामुळे समाजातून देणगी स्वीकारण्यात येत आहे.
डिपॉझीटसाठी लावणारी रक्कम गावागावातील श्रमिक एल्गारच्या महिलांनी जमा केली. काही कार्यकर्ते घरोघरी जाऊन निधी संकलीत करीत आहेत. पण, यातून आवश्यक निधी गोळा होणे शक्य नाही. म्हणून ऑनलाइन क्राउड फंडिंगमधून निर्णय घेतला. अवर डेमॉक्रासीने पुढाकार घेतला असून,  देशभरातून दानदात्यांकडून देणगी घेणार आहे. मदत जमा करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

 

About
Paromita Goswami Paromita Goswami founder, President, Shramik Elgar, mass organisation of unorganized sector, farmers and labourers in Vidarbha

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *