पारोमिता गोस्वामी
State Committee Member @AAPMaharashtra ।
श्रमिक एल्गार ही गांधी, तुकडोजीच्या विचारांवर श्रध्दा ठेवणारी संघटना आहे. त्यामुळे ही संघटना कायम हिसेंच्या विरोधात आहे. पोलिसांनी चिन्नाला मारून हिंसा केली. पोलिसाच्या हिसेंविरोधात श्रमिक एल्गारने ऐतिहासिक लढा दिला. पुढे काही दिवसानी, नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यातील धोडराज येथील मंगरू पल्लो व इतर मजूर असलेल्या ट्रकवर बॉम्बस्फोट घडवून आणला. यात मंगरू पल्लो हा जागीच ठार झाला, तर काही युवक मजूर गंभीर जखमी झालेत. कुणाचे हात तर कुणाचे पाय निकामी झालेत. या हल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, मृतक मंगरूची विधवा बिच्चीबाई हिला व इतर जखमीना शासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, नक्षलपीडितांसाठी असे कोणतेही धोरण नाही.
नक्षली हिसेंत बळी पडलेल्यांना स्थानिक साथ देत नाहीत. कारण त्यातून नक्षल्याकडून मदत करणाऱ्यांना धोका होण्यांची भिती असते आणि शासनही अशांना वाऱ्यांवर सोडत असल्यांने, या नक्षलपीडितांना शासनाने भरपाईचे धोरण जाहीर करावे, या मागणीसाठी नागपूर विभागीय आयुक्तांचे कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नक्षलपीडित व नक्षलप्रभावीत भागातील आदिवासी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्यांचे पाहून नक्षलवादी खवळले, त्यांनी नक्षलवाद्यांचे मासिक ‘प्रभात’ मध्ये श्रमिक एल्गारच्या व पारोमिता गोस्वामीच्या विरोधात लेख लिहून, जीवे मारण्याची धमकी दिली. याच मजकुरांचे पत्रके गावा-गावात वाटून, नक्षलग्रस्त भागातील कुणीही या आंदोलनात सहभागी होऊ नये, यासाठी धमक्या दिल्या. श्रमिक एल्गारचे त्यावेळचे कार्यकर्ते दिलीप आगडे (सिंदेवाही, मृतक) व गोपाल मंडल (चंद्रपूर) यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले. या कार्यकर्त्यांना स्थानिक मरकनार येथील श्रमिक एल्गारच्या महिला कार्यकर्त्यांनी सुखरूप सोडवून आणले. श्रमिक एल्गारने मात्र चंद्रपूर जिल्हयातील संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन, नागपूर विभागीय कार्यालयावर मोठे आंदोलन केले. त्यानंतर, नक्षलपीडितांसाठी शासनाने भरपाईचे धोरण जाहीर केले. श्रमिक एल्गारच्या लोकशाहीच्या लढ्याला यश आल्यांने पाहून, नंतर नक्षलवाद्यानी भामगरागड तालुक्यातील श्रमिक एल्गारच्या दोन आदिवासी कार्यकर्त्यांची हत्या केली. श्रमिक एल्गार गडचिरोली जिल्हातील आदिसवासींत लोकशाही भावना रूजवितांना नक्षलवादी आदिवासीं कार्यकर्त्यांची हत्या करीत असल्यांने श्रमिक एल्गारने या भागात ‘थेट’ काम करणे थांबविले.