एल्गार प्रतिष्ठान

एल्गार प्रतिष्ठान

1. समाजातील वंचित घटकांच्या सर्वांगीन विकासासाठी 1999 मध्ये एल्गार प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना.

2. संस्थेच्या माध्यमातुन तरून, महिला, मुलांना कायदा, संघटना बांधणी, लघु उद्योगावर प्रशिक्षण.

3. कौटुंबिक सल्ला केंद्राच्या माध्यमातुन महिलांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देणे.

4. 200 बचत गटाची स्थापना करून महिला सक्षमीकरण.

5. शहीद संदेश यात्रा, सायकल रॅलीने निघालेल्या यात्रेतुन स्वांत़़त्र्य लढयाची माहिती ग्रामीण भागातील जनतेला दिली.

6. शहिद स्मृती अभियान, 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य लढयाला 150 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्य चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयातुन शहीद स्मृती अभियान आयोजन. 1857 च्या लढयाचा इतिहास ग्रामीण भागातील जनतेला, शाळकरी मुलांना सांगितले.

7. सावित्री – फातिमा नमन अभियान – महिलांचे प्रश्न समजुन घेण्यासाठी व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी चंद्रपुर व गडचिरोली जिल्हयात सावित्री – फातिमा नमन अभियान काढून महिलांषी संवाद.

8. वीर बाबुराव शेडमाके प्रशिक्षण संकुल.

9. ग्रामीण भागातील महिला, आदीवासी तरूण, तरूणी यांना संघटना बांधणी, कायदे, व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण.

10. बचत गटातील महिलांना रोजगार विषयक प्रशिक्षण.

11. तरूणांना, स्वंयसेवकांना मार्गदर्शन शिबीर.

12. रेशन, राॅकेल, पाणी समस्या, चा-याची टंचाई, रोजगार अशा सामाजिक प्रश्नावर सर्वेक्षण करून लोकांचे प्रश्न प्रशासनापुढे आणले.

13. एल्गार बालविज्ञान व पर्यावरण केंद्र 

14. ग्रामीण भागातील विद्द्यार्थांत वैधानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी आणि अंधश्रध्दा निर्मुलन करण्यासाठी मुल येथे एल्गार बालविज्ञान पर्यावरण केंद्राची स्थापना. 1000 च्या वर विद्याथ्र्यांनी या केंद्राचा लाभ घेतला.