पारोमिता गोस्वामी
State Committee Member @AAPMaharashtra ।
कोरोना वायरसपासून बचाव करण्यासाठी लाॅकङाऊन करण्यात आल्याने सध्या बाजारपेठेत मालाची वाहतूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतमालाचे नुकसान होत आहे. त्यावर अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी जिल्हा परिषदेकङे भरपाईची मागणी केल्यानंतर प्रशासनाने शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे सुरू केले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक शेतकरी टमाटर, वांगे, मेथी, चवळी आदी भाजीपाला पिक घेतात. कोरोणाच्या महामारी मुळे व भारतातही कोरोणाची साथ पसरत असल्याने लाॅकडाऊन करण्यात आलेले आहे. अचानक लाॅकडावून जाहीर केल्याने, बाजारपेठा ओस पडलेल्या आहेत. नियमित आठवडी बाजारही भरत नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतलेले आहे. मात्र बाजार भरत नसल्याने व वाहतुकीची साधनेही पुरेशी नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे अडचणीचे झाले आहे. शिवाय बाजारही भरत नसल्याने या मालाला किमान भावही मिळत नाही की, ज्यातून मजुरीचा खर्चही निघू शकेल. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे भाजीपाला शेतातच सडत आहेत.
दुसऱ्या बाजूला शहरात भाजीपाला चढ्या भावाने विकल्या जात आहे. शहरात भाजीपाल्याला दर चांगला असला, तरीही हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरात मात्र याचा लाभ पडत नाही, ही वस्तुस्थिती आम आदमी पार्टीच्या नेत्या अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी आपल्या निवेदनातून जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकङे मांङली होती.
ज्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहेत, त्यांचा कृषी विभागामार्फत सर्वे करण्यात यावा, झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. जे माल शेतात शिल्लक आहे ते कृषी विभागामार्फत शहरांमध्ये रास्त भावात विक्रीची व्यवस्था करावी, अशी मागणीही अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी केली होती. त्यानंतर कृषी अधिकारी यांनी कृषी सहायकांना शेत बांधावर पाठवून पंचनामे करायला सुरवात केली आहे.